जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पहाटे लवकर मुंबईला कामावर जाणाऱ्या डहाणू ते वैतरणा मधील प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय पश्चिम रेल्वे कडून घेण्यात आलाय
सकाळी डहाणू वरुन 4 वाजून 55 मिनिटांनी शटल आता मेमू मधे रूपांतरीत झालीये. ही गाडी आता थेट बोरीवली पर्यंत नेण्याची मागणी करण्यात येतेय.
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेची ही मागणी केली होती. प्रवाशांची ही मागणी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलीये. गाडीची फेरी बोरिवली पर्यंत वाढविण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगण्यात आलंय.