Mumbai Local Train : 67 कोटी खर्चून पश्चिम रेल्वेची ‘ही’ खास सुरक्षा यंत्रणा, अपघात टाळण्यास होणार मदत

येत्या सप्टेंबर 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले असून, यासाठी सुमारे 67 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.<br/>

Mumbai Local Train :  67 कोटी खर्चून पश्चिम रेल्वेची ‘ही’ खास सुरक्षा यंत्रणा, अपघात टाळण्यास होणार मदत

Mumbai Local Train : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल प्रवासाला सुरक्षिततेचे अभेद्य कवच मिळणार आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार ते चर्चगेट या 60 किलोमीटरच्या अत्यंत गजबजलेल्या मार्गावर 'कवच' (Kavach) ही अत्याधुनिक रेल्वे संरक्षण प्रणाली बसवण्याचे 50 टक्के काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. येत्या सप्टेंबर 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले असून, यासाठी सुमारे 67 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

काय आहे 'कवच' आणि कसा होईल फायदा?

'कवच' ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची स्वयंचलित रेल्वे संरक्षण (ATP) यंत्रणा आहे. रेल्वे रुळांवरील सेन्सर्स, इंजिनमधील यंत्रणा आणि सॅटेलाईटच्या मदतीने ही प्रणाली एकाच मार्गावर समोरासमोर येणाऱ्या गाड्यांची धडक रोखते. तांत्रिक बिघाड किंवा मानवी चुकीमुळे (मोटमनकडून दुर्लक्ष झाल्यास) रेल्वेचा वेग मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास, ही यंत्रणा आपोआप ब्रेक लावून संभाव्य अपघात टाळते. सॅटेलाईटशी संवाद साधणारी 'टीकास' (TCAS) प्रणाली या मार्गावरील 17 स्थानकांवर बसवली जाणार असून, त्यापैकी 6 स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा – Ghat News : बोपदेव घाट पुढील 7 दिवस सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद; हे आहेत प्रशासनाने सुचवलेले पर्यायी मार्ग

प्रकल्पाची सद्यस्थिती आणि चाचण्या

या प्रकल्पांतर्गत टॉवर उभारणीचे 50 टक्के काम झाले असून, केबल टाकण्याचे काम 60 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. रेल्वे गाड्यांच्या ट्रॅकिंगसाठी आवश्यक असणारे 'आरएफआयडी' (RFID) टॅग बसवण्याचे कामही वेगाने सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रत्यक्ष परिस्थितीतील यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी 60 पैकी 24 किमी मार्गावर इंजिनच्या यशस्वी चाचण्या पार पडल्या आहेत. ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर मुंबईची उपनगरीय सेवा जागतिक दर्जाच्या सुरक्षा मानकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Ambernath Municipal Council: अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठ खिंडार; 12 नगरसेवकांचा सामूहिक भाजप प्रवेश

18 डब्यांच्या लोकलचीही होणार चाचणी

दरम्यान, सुरक्षिततेसोबतच प्रवाशांची क्षमता वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज झाली आहे. पालघर जिल्ह्यातील विरार ते डहाणू या मार्गावर येत्या 14 आणि 15 जानेवारीला 18 डब्यांच्या लांब लोकलची चाचणी घेतली जाणार आहे. ताशी 110 किमी वेगाने धावणाऱ्या या गाडीचे आपत्कालीन ब्रेक अंतर आणि डब्यांच्या जोडणीवर पडणारा ताण यांची यावेळी तपासणी केली जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number