टॉयलेट स्वच्छतेसाठी पश्चिम रेल्वेचा व्हॉट्स अॅप फंडा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   पश्चिम रेल्वे प्रशासन पे ॲंड युज शौचालयाकडे लक्ष देण्यास अखेर सज्ज झाले आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवरील शौचालये अस्वच्छ असल्याच्या तक्रारींचा सातत्याने पाढा वाचला गेल्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचललं आहे.   प. रेल्वे प्रशासनाने अनेक ठिकाणी असलेली अस्वच्छ पे ॲंड युज शौचालये आता स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले असून चक्क […]

टॉयलेट स्वच्छतेसाठी पश्चिम रेल्वेचा व्हॉट्स अॅप फंडा
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
 
पश्चिम रेल्वे प्रशासन पे ॲंड युज शौचालयाकडे लक्ष देण्यास अखेर सज्ज झाले आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवरील शौचालये अस्वच्छ असल्याच्या तक्रारींचा सातत्याने पाढा वाचला गेल्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचललं आहे.
 
प. रेल्वे प्रशासनाने अनेक ठिकाणी असलेली अस्वच्छ पे ॲंड युज शौचालये आता स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले असून चक्क प्रवाशांनाच त्यांनी अस्वच्छता दिसली तर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. आणि, ही तक्रार स्मार्ट फोनचा वापर करून करायची आहे. त्यासाठी, व्हॉट्सअॅपव नंबर 9004499733 या क्रमांकावर फोटो काढून पाठवायचा आहे. हा व्हाॅट्सॲप नंबर चोवीस तास सेवेसाठी तत्पर असणार आहे.

पश्चिम रेल्वेचं आवाहन –

  • रेल्वेतील पे ॲंड युज शौचालये अस्वच्छ असल्याच्या तक्रारी
  • परेकडून स्वच्छतेसाठी पुढाकार
  • परेच्या उपनगरीय स्थानकांवरील अस्वच्छ शौचालयांचे प्रवाशांनी फोटो काढून व्हाॅट्सॲपवर पाठवण्याची विनंती परे प्रशासनाची विनंती.
  • चोवीस तास ही सेवा सुरू
  • 9004499733 या क्रमांकावर पाठवा फोटो आणि तक्रार.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number