उत्तर प्रदेशात भाजप नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याने उत्तर प्रदेशची वाटचाल परिवर्तनाच्या दिशेने होत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच उत्तर प्रदेशामध्ये भाजप नेते-कार्यकर्त्यांचे पक्षांतर होत असल्याचेही संजय राऊत म्हटले आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस गोव्यात गेले आणि भाजप पक्ष फुटला, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून गोव्यात गेले. फडणवीस गोव्यात गेले आणि भाजप पक्ष फुटला. भाजपचे आमदार, प्रश्न नोटांचा असल्याचे म्हणत आहेत ते योग्य आहे. गोव्यातील जनतेने नोट्यांच्या दबावाखाली येऊ नका, असे शिवसेना गोव्यातील जनता सांगम्याचा प्रयत्न करेल. शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा पक्ष आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांना माझा शब्द आहे, आम्ही तुमच्या नोटांशी आम्ही लढू, असे संजय राऊत म्हटले आहेत.
तसेच उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता येणार, असे भाजपचे मत आहे. मात्र त्या पक्षाचेच नेते, कार्यकर्ते पक्षांतर करत असल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यामुळे उत्तर प्रदेशची वाटचाल परिवर्तनाच्या दिशेने होत असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.