पंतप्रधानांचे स्वागत असो! – सामना

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबईत येणार आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई नगरीत मोदींच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. भाजपने मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. ठाकरे गटाचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून मोदींचं स्वागत करण्यात आलं आहे. पण हे स्वागत करताना भाजपला चिमटे काढण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून […]

पंतप्रधानांचे स्वागत असो! – सामना

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबईत येणार आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई नगरीत मोदींच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. भाजपने मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. ठाकरे गटाचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून मोदींचं स्वागत करण्यात आलं आहे. पण हे स्वागत करताना भाजपला चिमटे काढण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातून सव्वा दोन लाख कोटींचे प्रकल्प पळवून नेले. हा मुंबईवरील आर्थिक आघात आहे. महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांच्या तोंडचा घास पळवून नेण्याचा हा प्रकार आहे. यालाच मुंबई – महाराष्ट्राचा भाग्योदय म्हणायचा का? असा सवाल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील गाड्यांसाठी मुंबई विद्यापीठाची भिंत तोडण्यात आली.

मुंबईच्या भागोदयाची सुरुवात विद्यापीठाची भिंत पाडून झाली. मुंबईतील एका महत्त्वाच्या वास्तूवर हातोडे घातले जात आहेत. तरीही आमच्या पंतप्रधानांचे स्वागत असो, नव्हे आहेच, असा चिमटा ‘सामना’च्या अग्रलेखातून काढण्यात आला आहे. काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महापालिकेची आणि प्रचाराच्या चिपळ्या भाजप वाजवणार. पंतप्रधान मुंबईत येतील आणि मुंबईचा कायापालट करतील असे जाहीर करण्यात आले आहे. मुंबईचे आर्थिक, औद्योगिक महत्त्व कमी करून केंद्र सरकारने कायापालट सुरू केला आहे, असा टोलाही ‘सामना’तून लगावण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number