लग्नातल जेवणं पडलं महाग

लातूर – जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील लग्नाच्या जेवणातून विषबाधा(Food Poison) झाल्याची धक्कादायक प्रकार केदारपूर गावात घडला आहे…लग्नात आलेल्या २०० हून अधिक वऱ्हाडी मंडळींना अन्नातून विषबाधा झाली आहे. केदारपूर गावात एक लग्नसोहळा पार पडला… यात लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना लग्नात जेवणं महाग पडलं आहे…जेवण झाल्यानंतर अनेकांना त्रास होऊ लागल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे…जेवणानंतर […]

लग्नातल जेवणं पडलं महाग

लातूर – जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील लग्नाच्या जेवणातून विषबाधा(Food Poison) झाल्याची धक्कादायक प्रकार केदारपूर गावात घडला आहे…लग्नात आलेल्या २०० हून अधिक वऱ्हाडी मंडळींना अन्नातून विषबाधा झाली आहे.

केदारपूर गावात एक लग्नसोहळा पार पडला… यात लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना लग्नात जेवणं महाग पडलं आहे…जेवण झाल्यानंतर अनेकांना त्रास होऊ लागल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे…जेवणानंतर काही वेळातच अनेकांना उलट्या, जुलाब आणि मळमळीचा त्रास जाणवू लागला…विषबाधा झालेल्या वऱ्हाडी मंडळीवर वलांडी,निलंगा,अंबुलगा बु ,आणि जवळगा येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत…विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. आता या वऱ्हाडी मंडळींची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या लग्नसोहळ्यात झालेल्या अन्न विषबाधेमुळे लग्नात आलेल्या वऱ्हाडींना मनस्ताप सहन करावा लागला आहे…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number