Weather Updates: विदर्भात पावसाचा रौद्र अवतार! पुढील तीन दिवस तुफान पावसाचा इशारा; विदर्भात शाळा-महाविद्यालये बंद

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडणार आहे.

Weather Updates: विदर्भात पावसाचा रौद्र अवतार! पुढील तीन दिवस तुफान पावसाचा इशारा; विदर्भात शाळा-महाविद्यालये बंद

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील 48 तासांत मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत, विशेषतः विदर्भात वादळी वाऱ्यासह अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मुंबईसह कोकण, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान 29 ते 31 जुलै या कालावधीत राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने आज आणि उद्यासाठी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत असून, राजापूर तालुक्यात अर्जुना नदीवरील सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवत नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 

हेही वाचा- Nashik-Palghar Earthquake: नाशिक-पालघर पुन्हा हादरलं! सलग भूकंपाच्या धक्क्यांनी वाढली चिंता; प्रशासन अलर्ट मोडवर

हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्हा आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मध्यरात्री अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. सध्या पावसाने काहीसी उसंत घेतली आहे. मात्र आज दिवसभर मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. रात्री झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील काही मार्गांच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

अर्धा पावसाळा कोरडा गेल्यावर मंगळवारी नागपूर शहराला अतिवृष्टीने झोडपले आहे. यावेळी नागपूर शहरात तब्बल 180 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नागपुरात ढग दाटून आले असून पावसाचा अतितीव्र जोर सुरू झाला आहे. यावेळी 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे. दरम्यान सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, जळगाव, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाटमाथा, परभणी, हिंगोली आणि जालना येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, नागपूर, वाशिम आणि यवतमाळमध्ये भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number