Weather Update: राज्यावर दुहेरी अस्मानी संकट! हवामान खात्याने दिला सावधानतेचा इशारा, ‘या’ तीन जिल्ह्यांमध्ये जारी केला ऑरेंज अलर्ट

अकोला, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात रेड अलर्टनंतर उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. 

Weather Update: राज्यावर दुहेरी अस्मानी संकट!  हवामान खात्याने दिला सावधानतेचा इशारा, ‘या’ तीन जिल्ह्यांमध्ये  जारी केला ऑरेंज अलर्ट

राज्यात सध्या उष्णतेचा कहर आहे. गेले काही दिवस अनेक राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. त्यातच आता पुढील दोन दिवस तीन जिल्ह्यांना अतितीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. अकोला, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात रेड अलर्टनंतर उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. 

रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. अहिल्यानगर, सांगली, ठाणे, रायगड, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण असेल. 

नागरिकांनी शक्यतो दुपारी अतिमहत्वाच्या कामाशिवाय 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळावे. गोंदिया जिल्ह्यात 44 ते 45 अंशावर तापमान आले असून वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या घटना पुढे येत आहेत.भंडारा जिल्ह्यात 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, यंदाच्या उन्हाळ्यातील हा सर्वाधिक उष्ण दिवस ठरल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

 गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा सतत चढत असल्याने अकोला जिल्ह्यासाठी रेड अलर्ट होता. नागरिकांनी शक्यतो दुपारी अतिमहत्वाच्या कामाशिवाय 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number