Weather Update: आज सूर्य आग ओकणार! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, प्रशासनाच्या सूचना

अमरावती, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. 

Weather Update: आज सूर्य आग ओकणार! हवामान विभागाचा  ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट,  प्रशासनाच्या सूचना

राज्यात उष्णतेचा कहर बघायला मिळतोय. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अलर्ट जारी केला. थेट उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 यादरम्यान घराबाहेर पडणे टाळावे. आज नागपूर, यवतमाळ, आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. अमरावती, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. 

दुपारनंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस होईल. घाट भागात ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच वादळी पावसाची शक्यता असून कोल्हापूरला यलो अलर्ट असेल. 

हेही वाचा – fertilizer price hike: आधी पेट्रोल-डिझेलने खिसा रिकामा केला, आता खतदरवाढीने शेतकरी संकटात! खरीप हंगामाआधी पोत्यामागे तब्बल इतक्या रुपयांची वाढ 

जवळपास जिल्ह्यांमध्ये 45 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे नीचांकी 18.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. यंदा देशातील उष्ण शहरांपैकी वर्धा शहर ठरत आहे. मागील सलग दोन दिवस 46.5 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाल्यानंतर पुन्हा तापमानात वाढ झाली.

हेही वाचा – Thane Fire: मोठी बातमी! ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केट इमारतीला आग; मोठं नुकसान, जिवीतहानी टळली 

आज तीन जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट, तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असेल. त्यामुळे घराबाहेर पडणे टाळावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट असेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number