Weather Update: अजूनही सरलं नाही अवकाळीचं सावट! येत्या दोन दिवसांत ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंगावत आहे.

Weather Update: अजूनही सरलं नाही अवकाळीचं सावट! येत्या दोन दिवसांत ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

सध्या राज्यातील वातावरणात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. अशातच आता ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंगावत आहे. 20 आणि 21 एप्रिल रोजी राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. मात्र, काढणीला आलेल्या शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूरला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट असेल. तसेच मराठवाड्यात, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीवला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट असेल. यावेळी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

20 आणि 21 एप्रिल रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्रा, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडेल. या विभागातील 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी विजांचा कडकडाट पाहायला मिळेल.

दरम्यान, अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री/झाकणाने सुरक्षित ठेवावीत.महाराष्ट्रातील बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम असतांना पुन्हा अवकाळी पाऊस सक्रिय होत आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number