Weather Update : हवामानात होणार मोठा बदल, कुठे बरसणार सरी तर कुठे तापमान जाणार चाळीशी पार…; जाणून घ्या

काही भागात तापमानात 2-3 अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. 

Weather Update : हवामानात होणार मोठा बदल, कुठे बरसणार सरी तर कुठे तापमान जाणार चाळीशी पार…; जाणून घ्या

ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्राला अवकाळी पावसाने तडाखा दिला. आता एप्रिलमध्ये हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. अवकाळीचा धोका टळला असला तरी कोकणात वेगळाच अलर्ट देण्यात आला आहे. काही भागात तापमानात 2-3 अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, 11 ते 13 एप्रिलपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे हवामान कोरडे राहील.  कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अलर्ट असल्याने नागरिकां काळजी घ्यावी लागेल. मध्य महाराष्ट्रात हवापालट झाली असून अवकाळीचा धोका टळला आहे. आज शनिवारी सातारा वगळता कोणत्याही जिल्ह्यात पावसाची शक्यता नही.घाट भागात हलक्या सरी कोसळतील.

हेही वाचा – AI In Healthcare: डॉक्टर चुकले, पण AI ने ओळखलं; ChatGPT मुळे समोर आला दुर्मिळ आजार; नेमकं काय घडलं? 

नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता नाही.  पुढील काही दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.कोकणात पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह सहा जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचं संकट आहे. उकाडा हैराण करेल. आज कोकणातील हवामान मुख्यत: कोरडे आणि आकाश निरभ्र राहील. मुंबईचा पारा 36 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – Digital Census India 2027: डिजिटल इंडियाचे नवे पर्व! जनगणनेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; पाहा कशी करावी 'स्व-गणना'

मराठवाड्यात उन्हाळा तीव्र होत आहे. तापमानाचा पारा चांगलाच चढला असून चाळिशीच्या घरात गेला आहे.  छत्रपती संभाजीनगरसह कोणत्याही जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि संभाजीनगरमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यांत तापमान चाळिशी पार जाण्याचा अंदाज आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number