महाराष्ट्रावर सध्या तिहेरी हवामान संकट घोंघावत आहे. यामध्ये पाऊस, वादळ आणि गारपिटीची शक्यता आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांना 72 तासांच्या आत मोठा धोका असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. आता हवामानाचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया.
राज्यात अवकाळीचा संकट असून 30 मार्चसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट तर 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील 72 तास धोक्याचे असणार आहेत.
हेही वाचा – Mumbai Dabbewala Update : मुंबईचे डब्बेवाले चालले सुट्टीवर! जेवणाची सेवा होणार बंद ; मोठं कारण समोर
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र, उष्णता आणि आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल.
सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा भागात वादळी पावसाची शक्यता आहे. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदडेला यलो अलर्ट असेल. विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील कमाल तापमान 34 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर किमान तापमान 20 ते 25 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.