Weather Update : कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढला! ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यात काय स्थिती?

दरवर्षी 7 जून रोजी मृग नक्षत्राची सुरुवात होते मात्र पावसाने अचानक काढता पाय घेतला. गेल्या काही दिवसांत पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी जुलै महिन्यातही जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

Weather Update : कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढला! ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यात काय स्थिती?

दरवर्षी 7 जून रोजी मृग नक्षत्राची सुरुवात होते मात्र पावसाने अचानक काढता पाय घेतला. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने पेरण्या खोळंबल्या आणि दुबार पेरणीचे संकट ओढवणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. राज्यात अनेक भागांत अजूनही उष्णता आणि उन्हाची तीव्रता जाणवत असून जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.गेल्या काही दिवसांत पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी खरी अपेक्षा आता जुलै महिन्यातही सातत्यपूर्ण आणि जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

अशातच राज्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि राज्यभरात पुढील 6 दिवस पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः रविवारी (28 जून) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज आहे. आजपासून संभाजीनगर, नाशिक, बीडचाही समावेश रविवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून पुण्यासह रायगड, रत्नागिरी आणि अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावेल.

हेही वाचा- TET Paper Leak : भिवंडीत पेपरफुटीचा पर्दाफाश! पुढे ढकलेल्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा शुल्क भरावं लागणार? शिक्षणमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

यावेळी कोकण किनारपट्टीवर 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तसेच मुंबई, पालघर आणि ठाणे येथे पावसाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची हजेरी नोंदवली जाणार आहे.

यावेळी विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नाशिक घाटमाथा, पुणे, अहिल्यानगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, वाशीम विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. 

जून महिना संपत आला तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मान्सूनने अद्याप अपेक्षित जोर पकडलेला नाही. सुरुवातीला काही भागात तुरळक हजेरी लावल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील एकूण सरासरी पावसात मोठी घट झाली आहे. महसूल विभागाच्या 27 जून 2026 पर्यंतच्या ताज्या अहवालानुसार, जिल्ह्याचा सरासरी पाऊस 125.2 मिमी आहे.

हेहा वाचा- Bank Holidays in July 2026: 4 रविवार, 2 शनिवार अन् सणवार… जुलै महिन्यात तब्बल 'इतक्या' दिवस बंद राहणार बँका; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

मात्र, प्रत्यक्षात केवळ 71.1 मिमी पाऊस झाला असून, जिल्ह्यात तब्बल 43.2 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी राजा मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे,तालुकावार आकडेवारीवर नजर टाकल्यास, खुलताबाद तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून तिथे केवळ 33.4 टक्के पाऊस झाला (अर्थात 66.6 टक्के तूट) आहे. दुसरीकडे सोयगाव तालुक्यात सर्वाधिक 115.9 मिमी पाऊस झाल्यामुळे तेथील परिस्थिती तुलनेने चांगली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number