Weather Update Western Disturbance : महाराष्ट्राच्या दिशेने वळतंय ते संकट! ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे होणार मोठे बदल

नागपूरांना चटके देणाऱ्या उन्हात दिलासा देणारी बातमी आहे. पुढील 2 ते 3 दिवस विदर्भात पावसाचा येल्लो तसेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Weather Update Western Disturbance : महाराष्ट्राच्या दिशेने वळतंय ते संकट! ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे होणार मोठे बदल

नागपूरांना चटके देणाऱ्या उन्हात दिलासा देणारी बातमी आहे. पुढील 2 ते 3 दिवस विदर्भात पावसाचा येल्लो तसेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पूर्वोत्तर भारतातील काही भागात वेस्टर्न डिस्टर्बची स्थिती निर्माण झाली असल्याने त्याचा परिणाम मध्य भारतात होण्याची शक्यता वर्तावली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची दाट शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. तसेच काही ठिकाणी गारपिटीची ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाऊस व ढगाळ वातावरण दोन-तीन दिवस कायम राहणार असल्याने तापमानात देखील घट होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा- Weather Update: कडाक्याच्या उन्हाळ्यात मोठा बदल होणार! विदर्भ-मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात तुफान गारपीट; कोकण किनारपट्टीवर…
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून ‘पश्चिमी विक्षोभ’ (Western Disturbance) तयार झालेलं असून ते वारे हळूहळू भारताच्या दिशेने वळत आहेत. त्रिपुरा आणि मेघालय, पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या काही पट्ट्यात अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे साक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. पश्चिमी विक्षोभ म्हणजे कॅस्पियन समुद्र किंवा भूमध्य समुद्रात निर्माण होणारे थंड वारे व वादळाचे प्रणाली. हे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणजेच भारताच्या दिशेने प्रवास करतात. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराणमार्गे ते भारतात पोहोचतात. यांचा प्रवास अत्यंत थंड वातावरणातून होतो आणि त्यामुळेच ते मोठ्या प्रमाणात बर्फ व आर्द्रता घेऊन येतात. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number