Weather Update : अजूनही धोका टळलेला नाही…, कोकण ते विदर्भात दुहेरी संकट; हवामान खात्याचा इशारा काय?

गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी अजून धोका टळलेला नाही.

Weather Update : अजूनही धोका टळलेला नाही…, कोकण ते विदर्भात दुहेरी संकट; हवामान खात्याचा इशारा काय?

गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी अजून धोका टळलेला नाही. आज सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत दुहेरी संकट जाणवण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलका पाऊस तसेच काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. याउलट कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज कोकणासह मुंबईत हवामान कोरडे राहणार असून उन्हाचा पारा चढलेला जाणवायला मिळू शकतो. कोकणात आज कमाल तापमान 24 अंश तर किमान तापमान 33.6 अंश सेल्सिअस इतके आहे. कोकणातील रत्नागिरी येथे कमाल तापमान 31.7 अंश तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके आहे. 

हेही वाचा- Strait of Hormuz Close: आता इस्रायलमुळे जगावर संकट! इराणचा मोठा निर्णय; काही तासांतच होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद?, कारण…
‎उत्तर महाराष्ट्रात आज कमाल तापमान 16.8 अंश तर किमान तापमान 36.6 अंश सेल्सिअस इतके राहणार असून नाशिकसह अनेक भागात कोरडे वातावरण राहिल. मराठवाड्यात आज कमाल तापमान 19.1 अंश तर किमान तापमान 37.5 अंश सेल्सिअस इतके आहे. तसेच धाराशिव छत्रपती संभाजीनगर येथे वादळी पावसाची शक्यता आहे. तर ‎पश्‍चिम महाराष्ट्रात आज कमाल तापमान 16.8 अंश तर किमान तापमान 38 अंश सेल्सिअस इतके आहे. पुण्यासह कोल्हापूर, सातारा भागात आज तापमान 34-38 अंशांच्या दरम्यान राहणार असून हवामान कोरडे राहील. ‎विदर्भात आज पावसाची शक्यता कमी असून कमाल तापमान 20 अंश तर किमान तापमान 38.2 अंश सेल्सिअस इतके आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number