Weather Update: राज्यात उष्णतेचा पारा वाढला! कोणत्या भागात रेड, येलो आणि ऑरेंज अलर्ट? संपूर्ण यादी पाहा

महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट कायम आहे. मुंबईसह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या तीव्र लाटा अनुभवायला मिळत आहे.

Weather Update: राज्यात उष्णतेचा पारा वाढला! कोणत्या भागात रेड, येलो आणि ऑरेंज अलर्ट? संपूर्ण यादी पाहा

महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट कायम आहे. मुंबईसह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या तीव्र लाटा अनुभवायला मिळत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला असून दुसरीकडे कोकणात मात्र दमट स्थिती आहे. कोकणात मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात आज कमाल तापमान 36-37 अंशांवर तर किमान 27-28 अंश सेल्सिअसवर असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा तीव्र असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकसह, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये कमाल तापमान 40 ते 41 अंशांवर पोहोचले आहे.

हेही वाचा- Monsoon Weather Update : 1-2 नव्हे तर तब्बल 24 वेळा मुंबईवर येणार मोठं नैसर्गिक संकट! जाहीर झालेल्या तारखा जाणून घ्या

उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर जाणवत असून जिल्ह्यातील 55 गावांसह 128 वड्या अशा एकूण 180 गावामध्ये  टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसभरात 61 टँकर द्वारे 128 फेऱ्या करून नागरिकांना पाणी दिले जात आहे. एप्रिलअखेर उष्णतेची तीव्रता वाढल्याने जलसाठे घटले. दिवसाला सुमारे 69 टँकरद्वारे 182 फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती आहे. पाणी टंचाईमुळे येवला, सिन्नर, इगतपुरी, मालेगाव, पेठ तालुक्यांतून टँकरची मागणी अधिक वाढली आहे. आदिवासी वाड्या-वस्त्यांवर परिस्थिती अधिक गंभीर असून प्रशासनाकडे टँकर वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापुरात कमाल तापमान 39-40 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत कमाल तापमान 41 अंशांपेक्षा जास्त राहणार असल्याची माहिती आहे. विदर्भात नागपूरसह अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ परिसरात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमान सलग दहा दिवस 41 ते 45 अंश सेल्सिअसदरम्यान स्थिर आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number