हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोटीत सापडली शस्त्र

komal mane श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी संशयास्पद बोट सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-४७ आढळल्या आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. या घटनेमुळे  खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देण्यास नकार दिला आहे. […]

हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोटीत सापडली शस्त्र

komal mane

श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी संशयास्पद बोट सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-४७ आढळल्या आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. या घटनेमुळे  खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.

 या प्रकरणी कोणतीही व्यक्ती आढळली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे. तर, दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांना काही संशयास्पद बोटी किनाऱ्यावर असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांकडून गस्त घालण्यात येत होती. रायगडमध्ये शस्त्र असलेली बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्र मार्गे आले होते. त्याशिवाय, मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्सदेखील श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते. या सगळ्या भूतकाळांतील घटनांचा विचार केला असता पोलीस प्रशासनाची चिंता वाढली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

रायगडमधील श्रीवर्धनमधील हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेल्या संशयास्पद बोटीनंतर राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सागरी किनाऱ्यावरील पालघर, रत्नागिरी किनाऱ्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर, मुंबई, पुण्यात नाकेबंदी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.  रायगडमधील श्रीवर्धनमधील हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेलr संशयास्पद बोट ओमान देशातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या स्पीड बोटीवर आढळून आलेल्या नावाच्या कंपनीची नोंदणी ब्रिटनमधील असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. रत्नागिरीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीच्या लँडिंग पॉईंटवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number