मराठा समजाला कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणावर महत्वपूर्ण चर्चेसाठी सरकारनं आज मराठा समाजातील मान्यवरांची बैठक बोलावली होती. याबैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. तसचं आंदोलनात हिंसा करू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे उपस्थित होते. या बैठकीला उद्योजक भैरवनाथ ठोमरे, कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, अभिनेते सयाजी शिंदे, अमोल कोल्हे, विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, सुवर्ण कोकण संस्थचे डॉ. सतीश परब हजर होते.