आम्हाला ऑनलाईन नव्हे, तर अध्यापनाची कामे करु द्या – जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव जळगावात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. ऑनलाईन कामातून शिक्षकांची मुक्ती करावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात शिक्षक सहभागी झाले होते. याठिकाणी ऑनलाईन कामाच्या त्रासाला कंटाळून आबासाहेब चौधरी या शिक्षकानं आत्महत्या केली होती. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करून इतरही ऑनलाईन कामं त्यांना करावी लागता. […]

आम्हाला ऑनलाईन नव्हे, तर अध्यापनाची कामे करु द्या – जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

जळगावात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. ऑनलाईन कामातून शिक्षकांची मुक्ती करावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात शिक्षक सहभागी झाले होते. याठिकाणी ऑनलाईन कामाच्या त्रासाला कंटाळून आबासाहेब चौधरी या शिक्षकानं आत्महत्या केली होती.

विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करून इतरही ऑनलाईन कामं त्यांना करावी लागता. ही अतिरिक्त कामं शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरतेय. त्यामुळे आम्हाला फक्त अध्यापनाचं काम करू द्यावं अशी मागणी या शिक्षकांनी केलीय. यावेळी आपल्या मागण्याचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number