आम्हाला सुरक्षेची गरज नाही – फुटीरतावादी नेता अब्दुल गनी भट

जम्मू काश्मीरच्या सरकारने पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या आणि आयएसआयच्या संपर्कात असलेल्या फुटीरतावादी नेत्यांना दिलेले सुरक्षा काढून टाकल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी गाड्याही काढून घेणार असल्याचे सांगितले आहे.    आपल्याला सुरक्षा सरकारनेच दिली होती. तसेच आम्ही कधीही सुरक्षा मागितली नसल्याचे, हुर्रियत कॉन्फरन्सने सांगितले. नेमकं प्रकरण काय ? मीरवाइज उमर फारूक, शब्बीर शाह, […]

आम्हाला सुरक्षेची गरज नाही – फुटीरतावादी नेता अब्दुल गनी भट

जम्मू काश्मीरच्या सरकारने पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या आणि आयएसआयच्या संपर्कात असलेल्या फुटीरतावादी नेत्यांना दिलेले सुरक्षा काढून टाकल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी गाड्याही काढून घेणार असल्याचे सांगितले आहे.    आपल्याला सुरक्षा सरकारनेच दिली होती. तसेच आम्ही कधीही सुरक्षा मागितली नसल्याचे, हुर्रियत कॉन्फरन्सने सांगितले.

नेमकं प्रकरण काय ?

मीरवाइज उमर फारूक, शब्बीर शाह, हाशिम कुरैशी, बिलाल लोन आणि अब्दुल गनी बट या नेत्यांना जम्मू- काश्मीर पोलिसांनी संरक्षण दिले होते.

मात्र त्यांना दिलेली सुरक्षा मागे घेण्यात आली आहे.

फुटीरतावादी नेता अब्दुल गनी भटने त्यांना राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुरक्षेची गरज नसल्याचे म्हटले आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता आहे. माझी सुरक्षा काश्मीरी जनता आहे.

मला कोणत्याही सरकारी सुरक्षेची गरज नाही, असे त्यांनी म्हटलं आहे.

तसेच हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मीरवाइज यांनी सुरक्षेची गरज गरज नसल्याचे म्हणाले.

तसेच सुरक्षा काढून घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number