राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार हा गुलदस्त्यातच ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोनच मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. पण अजूनही शिंदे सरकारला मंत्री मिळाले नाही. ‘मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याबद्दल आमची चर्चा सुरू आहे. विस्ताराची तारीखला ठरली की सर्वात आधी मी तुम्हाला सांगेन, असं उत्तर फडणवीस यांनी दिले आहे.
तसेच, मुख्यमंत्री सौर कृषी यंत्रणा आम्ही आणली आहे. आज आम्ही बैठक घेतली आहे. पुढच्या वर्षभरात आम्ही ही योजना कशी राबवता येईल यावर काम करत आहोत. ३० टक्के अग्रीक्लचर फिडर आणता येईल का याचा आम्ही विचार करत आहोत. अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना ज्या बिल न भरल्याने बंद आहेत त्यावर देखील काम सुरू आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. आता जुनी सर्व थकबाकी याबाबत महावितरणाने विचार करावा तसेच राज्य सरकार देखील विचार करत आहे. सर्व योजना तत्काळ सुरू कराव्यात असा निर्णय आपण घेतला आहे. कृषी पंपासाठी अर्ज केला आहे त्यासर्वाना पुढच्या ६ महिन्यात सोलर पंप देऊन ती योजना मुख्यमंत्री यांना सादर करू, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
उपसा सिंचन योजना सोलरवर कशा टाकता येतील यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. लोकांची राहण्याची चांगली सोय करा, असे मुख्यमंत्री यांनी सांगितल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.