मुंबईकरांसाठी आजचा दिवस तहानलेला; दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरात पाणी कपात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईत माहिम भागात भूमिगत बोगद्याच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे कुलाबा ते सायन, माहिम आणि पश्चिम उपनगरातील काही भागांमध्ये आज संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर, काही भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. माहिम भूमिगत बोगद्याजवळ एक हजार 200 मिमी. व्यासाच्या झडपेच्या दुरुस्तीचं काम महापालिकेने हाती घेतले आहे. […]

मुंबईकरांसाठी आजचा दिवस तहानलेला; दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरात पाणी कपात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईत माहिम भागात भूमिगत बोगद्याच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे कुलाबा ते सायन, माहिम आणि पश्चिम उपनगरातील काही भागांमध्ये आज संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर, काही भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. माहिम भूमिगत बोगद्याजवळ एक हजार 200 मिमी. व्यासाच्या झडपेच्या दुरुस्तीचं काम महापालिकेने हाती घेतले आहे.

सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत  हे काम सुरु राहणार आहे. त्यामुळे कुलाबा ते सायन, माहिम आणि पश्चिम उपनगरातील काही भागांमध्ये गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, तर काही भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.भूमिगत बोगद्याच्या या कामासाठी मरोळ-मरोशी पासून माहिम-रुपारेल ते रेसकोर्सपर्यंतचा जलबोगदा बारा तासांसाठी बंद करावा लागणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number