Nashik Water Shortage : नाशिककरांनो लक्ष द्या! जलसंपदा विभागाचा महापालिकेला अलर्ट; आता आठवड्यातून 1 दिवस पाणी…

पाणीपुरवठा बाबत प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक शहरात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Nashik Water Shortage : नाशिककरांनो लक्ष द्या! जलसंपदा विभागाचा महापालिकेला अलर्ट; आता आठवड्यातून 1 दिवस पाणी…

उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना नाशिककरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाणीपुरवठा बाबत प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक शहरात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नाशिकमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यासंबंधी जलसंपदा विभागाने महापालिकेला अलर्ट जारी केला आहे. 31 ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा संदर्भात नियोजनासाठी एक दिवस पाणी बंद ठेवण्यावर चर्चा सध्या सुरु आहे.

हेही वाचा- Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवास करताय? सावधान! दोन दिवस इतक्या तासांचा मेगाब्लॉक; ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

रोज 15 टक्के पाणी कपात करण्यावर देखील विचार करण्यात येणार आहे. तसेच उपाययोजना म्हणून 15 टक्के कपात किंवा आठवड्यातून 1 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त मनिषा खत्री अंतिम निर्णय घेणार असून आयुक्त व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठकीनंतर यासंबंधी निर्णय होणार आहे. जलसाठ्याची उपलब्धता आणि पाणी व्यवस्थापन सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या निर्णयामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच साठवणुकीची योग्य व्यवस्था करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. आठवड्यातील ठराविक दिवशी पाणी बंद राहणार असल्याने शहरातील विविध भागांमध्ये वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करण्यात येईल. उन्हाळ्याच्या या तीव्र परिस्थितीत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता नाशिक शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number