मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद

मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा विषयक दुरुस्ती कामामुळे एम/पूर्व आणि एम/पश्चिम विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे आवाहन एम/पूर्व आणि एम/पश्चिम विभागातील नागरिकांना केले आहे. मुंबई महापालिकेतर्फे दिनांक ८ फेब्रुवारी, २०२३ रोजी ट्रॉम्बे उच्च स्तरिय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम […]

मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद

मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा विषयक दुरुस्ती कामामुळे एम/पूर्व आणि एम/पश्चिम विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे आवाहन एम/पूर्व आणि एम/पश्चिम विभागातील नागरिकांना केले आहे. मुंबई महापालिकेतर्फे दिनांक ८ फेब्रुवारी, २०२३ रोजी ट्रॉम्बे उच्च स्तरिय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

१) एम/पूर्व विभागः बीट क्रमांक १४० ते १४६ – टाटानगर, गोवंडी स्टेशन मार्ग, देवनार म्युनिसिपल वसाहत, गोवंडी, लल्लूभाई इमारत, जॉन्सन जेकब मार्ग, एसपीपीएल इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर, देवनार गाव रस्ता, गोवंडी गाव, व्ही. एन. पुरव मार्ग, बीकेएसडी मार्ग, दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गाव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गाव, गोवंडी स्टेशन रोड, सी-सेक्टर, डी-सेक्टर, ई-सेक्टर, जी-सेक्टर, एच-सेक्टर, जे-सेक्टर, के-सेक्टर, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम रोड, दत्त नगर, बालाजी मंदिर मार्ग, पायलीपाडा चिता कॅम्प ट्रॉम्बे, देवनार फार्म रोड, बोरबादेवी नगर, बी.ए.आर.सी. फॅक्टरी, बी.ए. आर.सी. वसाहत, गौतम नगर, पांजरापोळ – दि. ०८.०२.२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दि. ०९.०२.२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

२) एम/पश्चिम विभागः बीट क्रमांक १५२ व १५३ – घाटला अमर नगर, मोती बाग, खारदेव नगर, वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ वसाहत (कॉलनी), लाल डोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लाल वाडी, मैत्री पार्क, अतूर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर आणि श्रमजीवी नगर – (दि. ०८.०२.२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दि. ०९.०२.२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number