मुंबईकरांची पाणीकपात बंद होणार

मुंबई, ७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यांतरी पावसाने उसंत घेतली होती. परंतु पावसाची सतत सुरू असणारी संततधार यामुळे मुंबईतील सातही तलावं फुल भरली आहेत. जुलै महिन्यात राज्यासह मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई शहराला मोडक सागर, अप्पर […]

मुंबईकरांची पाणीकपात बंद होणार

मुंबई, ७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यांतरी पावसाने उसंत घेतली होती. परंतु पावसाची सतत सुरू असणारी संततधार यामुळे मुंबईतील सातही तलावं फुल भरली आहेत. जुलै महिन्यात राज्यासह मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई शहराला मोडक सागर, अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा, विहार, भातसा आणि तुळशी या सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. यंदा ऑगस्ट महिन्यापर्यंत या सातही जलाशयांमध्ये ८० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठी मुंबईकरांची ३०० दिवस तहान भागवू शकले एवढा आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठी या तलावांमध्ये जमाल झाला आहे. तरीदेखील मुंबईत सुरु असलेली १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय मुबंई महापालिकेने एक आठवडा पुढे ढकलला आहे.

मुंबईत १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात लागू आहे. सात धरणांपैकी चार तलाव आठ दिवसांत तुडूंब झाल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मात्र, जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने धरण क्षेत्रांतील पाण्याच्या पातळीने तळ गाठला होता. त्यामुळे पाण्याची चिंता वाढू लागली होती. २८ जुलै रोजी सातही धरणात ९ लाख ८५ हजार दशलक्ष लिटरहून अधिक पाणीसाठा जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

तानसा – १४३७६९ दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा – १८७२०८ दशलक्ष लिटर

भातसा – ५२२०३२ दशलक्ष लिटर

विहार – २७६५८ दशलक्ष लिटर

तुळशी – ८०४६ दशलक्ष लिटर

३ ऑगस्ट रोजीपर्यंत सात तलावांत ११ लाख २८ हजार ३४५ दशलक्ष लिटर (७७.९५ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील २९३ दिवस म्हणजे २१ मे २०२४ पर्यंत पुरेल इतका आहे. लोकप्रतिनिधींकडून पाणीकपात रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे; मात्र पालिका प्रशासन अद्याप पाणीकपात रद्द करीत नसल्याने मुंबईकरांना अद्यापही पाणीकपात रद्द होण्यासाठी प्रतिक्षाच करावी लागत आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number