Homeताज्या बातम्याMumbai Water Cut : मुंबईकरांवर पाणीकपाचे संकट? मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा 7 टक्क्यांवर; कमी पावसाचा फटका
Mumbai Water Cut : मुंबईकरांवर पाणीकपाचे संकट? मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा 7 टक्क्यांवर; कमी पावसाचा फटका
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अपेक्षित वाढ न झाल्याने पाण्याची परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. सध्या धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा केवळ 7 टक्के इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ होणार आहे. हवामान विभागाकडून पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी रविवारी धरण परिसरात पावसाची नोंद झाली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढेल, […]
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अपेक्षित वाढ न झाल्याने पाण्याची परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. सध्या धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा केवळ 7 टक्के इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ होणार आहे. हवामान विभागाकडून पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी रविवारी धरण परिसरात पावसाची नोंद झाली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेला पाऊस मोठ्या प्रमाणात जमिनीत शोषला जात असल्याने त्याचा धरणांमध्ये तातडीने परिणाम दिसून येत नाही. धरणांच्या जलस्रोत भागात सलग मुसळधार पाऊस झाल्यानंतरच पाण्याची आवक वाढण्यास सुरुवात होणार आहे.