छत्रपती संभाजीनगरात टँकरसाठी दोन दिवसांची प्रतीक्षा, दरात तिप्पट वाढ

शहरात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असतानाच टँकरमाफियांनी दर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे.

छत्रपती संभाजीनगरात टँकरसाठी दोन दिवसांची प्रतीक्षा, दरात तिप्पट वाढ

छत्रपती संभाजीनगर: शहरात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असतानाच टँकरमाफियांनी दर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. शहरात गेल्या महिनाभरात खाजगी पाण्याच्या टँकरच्या दरात तब्बल तीनपट वाढ झाली आहे. पूर्वी फक्त 500 रुपयांना मिळणारा 5000 लिटरचा टँकर आता दीड हजार रुपये मोजूनही वेळेवर मिळत नाही. काही भागांत 300 रुपयांत मिळणारे लहान टँकरसुद्धा आता 800 रुपयांवर पोहोचले आहेत.

या वाढत्या मागणीमुळे टँकरसाठी आता किमान दोन दिवसांची वेटिंग लागते आहे. गावकऱ्यांनी ही माहिती दिली असून, . उन्हाळ्याच्या झळांत पाण्याची टंचाई अधिक तीव्र झाल्याने नागरिकांना दुसऱ्याच दिवशीसुद्धा पाणी मिळेल याची शाश्वती उरलेली नाही. त्यामुळे दरवाढीचा फटका सर्वात जास्त गोरगरीबांना बसतो आहे.

शहरात सध्या जवळपास 1600 खाजगी टँकर कार्यरत असून, दररोज सुमारे अडीच कोटी रुपयांचे पाणी शहरवासीयांना विकले जात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.पाण्याच्या या काळवधीत टँकरमाफियांवर अंकुश आणण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number