बर्गर पानाचा व्हिडिओ पाहाच

मुंबई, २८ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ येऊ लागलेत. विशेष म्हणजे खवय्ये अगदी मनसोक्तपणे या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेताना दिसतात. चांगल्या बरोबरच काही विचित्र खाद्य पदार्थ देखील बाजारात येऊ लागलेत.अलीकडेच असाच एक विचित्र पदार्थ बाजारात मिळू लागलाय. या खाद्य पदार्थाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत तुम्ही […]

बर्गर पानाचा व्हिडिओ पाहाच

मुंबई, २८ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ येऊ लागलेत. विशेष म्हणजे खवय्ये अगदी मनसोक्तपणे या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेताना दिसतात. चांगल्या बरोबरच काही विचित्र खाद्य पदार्थ देखील बाजारात येऊ लागलेत.अलीकडेच असाच एक विचित्र पदार्थ बाजारात मिळू लागलाय. या खाद्य पदार्थाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आतापर्यंत तुम्ही आईस्क्रीम पाणीपुरी , चॉकलेट बिर्याणीपर्यत अनेक विचित्र मिश्रण असलेल्या पदार्थांची नावे ऐकली असतील. आता आणखी एक असाच आगळा वेगळा पदार्थ बाजरात आलाय. तो म्हणजे ‘बर्गर पान’.या बर्गर पण चा विडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बर्गर पान बनवत आहे. यासाठी त्याने सुपारीच्या पानांबरोबरचकात, बडीशेप, गुलकंद अशा अनेक गोष्टी ठेवल्या. एवढेच नाही तर सुका मेवा जसे बदाम, गोड चवीची बडीशेप, चॉकलेट आणि इतर अनेक गोड पदार्थ सुपारीच्या पानावर ठेवतात. त्यानंतर दुकानदार मेयोनीजऐवजी पानाच्या शेवटी फ्रेश क्रीम शिंपडताना दिसतो. शेवटी तर कहरच केला शेवटी तो एक बर्गर चा ब्रेड घेऊन त्यात हे बनवलेले पण ठेवतो. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number