प्रतिनिधी
वर्धा/ प्रमोद पानबुडे:
गुरूवार 28 रोजी दुपारी 3.50 वाजताच्या सुमारास तालुक्यात वादळी वार्यापसह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरील टिनपत्रे उडाली तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्याने मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील नागरिक ऊन व उकाड्याने हैराण झाले आहे. गुरूवारी दुपारपर्यंत जीवाची काहीली करणारी ऊन असताना दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होत आकाशात ढग दाटून आले. शिवाय वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी परिसरात कोसळल्या. पण या वादळी पावसादरम्यान सेलू आणि परिसरातील काही गावांतील घरांचे टिनपत्र उडाल्याने नागरिकांची मोठे नुकसान झाले आहे.
नजिकच्या घोराड येथे गावालगतच्या देवराव राऊत यांच्या शेतात झाडाखाली बांधून असलेल्या बैलजोडी जवळून वीज गेल्याने बैलांना धका बसला. यात एका बैलाचा मृत्यू झाला. तर सेलूच्या विकास चौकात रस्त्याच्या कडेला असणार्याब पानटपर्याज पडल्या. या टपर्यांलमध्ये आश्रयास आलेली व्यक्ती थोडक्यात बचावले. तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांद्या तुटल्या. शिवाय चौकातीलच इमारतीवरील मोबाईलचे टॉवरचे वादळीवाऱ्यामुळे नुकसान झाले. तसेच पंचायत समिती परिसरातील वृक्ष कोसळल्याने विजेच्या तारा तुटल्या. तर सोनिया नगरातील एका घराबाहेर ठेवलेला लोखंडी पलंग उडून थेट वीज खांबावरील तारांवर जावून अडकला. शेत शिवारतही अनेक झाडे उन्मळून पडल्याचे वृत्त आहे.
भिंत कोसळून 300 कोंबड्या ठार
सेलूतील प्रभाग 4 मधील कोतीवाडा परिसराला वादळाचा सर्वाधिक फटका बसला. येथील अनेक घरांची पत्र्यांची छते उडून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी नगरसेविका रुखसार पठाण यांनी नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह भेट देत नुकसानीचा आढावा घेतला. घोराड येथे शरद रामभाऊ वरटकर यांच्या पोल्ट्री फॉर्मचेही मोठे नुकसान झाले. वादळामुळे पोल्ट्री फॉर्मची भिंत कोसळून 300 कोंबड्यांचा मृत्यू झाला. यात त्यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.