अ‍ॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचे उत्पादन वर्ध्यातून होणार

वर्धा: कोरोनानंतर होणार्‍या ब्लॅक फंगस इन्फेक्शन म्हणजेच म्युकरमायकोसिस रोखण्यासाठी वापरण्यात येणारे अ‍ॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचे उत्पादन वर्ध्यातून सुरु झाले असून जेनेटिक लाईफ सायन्सेसचे डॉ. क्षीरसागर यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी या इंजेक्शनचा शुभारंभ केला. अ‍ॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा तुटवडा आणि होत असलेला काळाबाजार पाहता गडकरी यांनी हे इंजेक्शनही विदर्भात तयार व्हावे, यासाठी […]

अ‍ॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचे उत्पादन वर्ध्यातून होणार

वर्धा: कोरोनानंतर होणार्‍या ब्लॅक फंगस इन्फेक्शन म्हणजेच म्युकरमायकोसिस रोखण्यासाठी वापरण्यात येणारे अ‍ॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचे उत्पादन वर्ध्यातून सुरु झाले असून जेनेटिक लाईफ सायन्सेसचे डॉ. क्षीरसागर यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी या इंजेक्शनचा शुभारंभ केला.

अ‍ॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा तुटवडा आणि होत असलेला काळाबाजार पाहता गडकरी यांनी हे इंजेक्शनही विदर्भात तयार व्हावे, यासाठी प्रयत्न केले. १४ मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला अ‍ॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शन निर्मितीची मंजुरी मिळाली. महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून ही मंजुरी देण्यात आली. कच्चा माल उपलब्ध झाल्यास दररोज २० हजार इंजेक्शनचे उत्पादन ही कंपनी करणार आहे.

या इंजेक्शनचा सध्या तुटवडा आहे. जेनेटिक लाईफ सायन्सेस हे इंजेक्शन १२०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number