गडद मेहंदी हवी; मग ‘हे’ उपाय करा

सणासुदीला ,लग्न समारंभाला आपल्याला मेहंदी लावायला खूप आवडते. मेहंदी तुमच्या सौंदर्यात तर भर घालतेच पण त्याचसोबत मेहंदीमुळे आपल्याला गारवादेखील मिळतो. आपली मेहंदी कशी जास्त गडद रंगेल यांची सगळ्यांना उत्सुकता असते. मेहंदी काढल्यानंतर कोणत्याही रासायनिक पद्धतीने मेहंदीचा रंग गडद करण्यापेक्षा तुम्ही घरगुती पद्धतीने देखील ते करू शकता,चला पाहुया- मेहंदी तेल: हातावर मेहंदी लावण्यापूर्वी तुम्ही मेहंदी तेल […]

गडद मेहंदी हवी; मग ‘हे’ उपाय करा

सणासुदीला ,लग्न समारंभाला आपल्याला मेहंदी लावायला खूप आवडते. मेहंदी तुमच्या सौंदर्यात तर भर घालतेच पण त्याचसोबत मेहंदीमुळे आपल्याला गारवादेखील मिळतो. आपली मेहंदी कशी जास्त गडद रंगेल यांची सगळ्यांना उत्सुकता असते. मेहंदी काढल्यानंतर कोणत्याही रासायनिक पद्धतीने मेहंदीचा रंग गडद करण्यापेक्षा तुम्ही घरगुती पद्धतीने देखील ते करू शकता,चला पाहुया-

मेहंदी तेल: हातावर मेहंदी लावण्यापूर्वी तुम्ही मेहंदी तेल लावा. यामुळे मेहंदीचा रंग अधिक गडद होऊ लागतो.अनेक मेहंदी आर्टिस्ट याचा वापर करतात.

लवंग : मेहंदी सुकल्यावर एका लहानशा पॅनमध्ये ७-८ लवंगा घेऊन त्या गरम करा. यातून धूर निघायला लागला की हाताचे तळवे थोड्या अंतरावर ठेऊन ती वाफ हातावर घ्या. साधारण ३-४ वेळा असे केल्याने गडद रंग येण्यासाठी मदत होते.

मोहरीचे तेल : मेहंदी काढल्यानंतर मोहरीचे तेल हातावर चोळावे त्यामुळे मेहंदीचा रंग गडद होण्यास मदत मिळते.

लिंबू आणि साखरेचे पाणी : एका वाटीत साखर आणि त्यात लिंबाचा रस पिळून मिक्स करून घ्या. पाणी अजिबात वापरू नये. मेहंदी सुकल्यावर एका कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण मेहंदीवर अगदी हलक्या हाताने लावून घ्यावे. यामुळे मेहंदी अधिक काळ टिकून गडद रंग येतो.

आंब्याच्या लोणच्याच्या तेल : आंब्याच्या लोणच्याच्या तेलामुळेही मेहंदीचा रंग अधिक गडद होतो.या तेलात असणाऱ्या मसाल्यांचा अर्क मेहंदी सुकल्यानंतर त्याला गडद रंग देतो. मेहंदी काढून टाकल्यावर थोडेसे लोणच्याचे तेल हातावर घेऊन त्याने हात घासावेत.यामुळे मेहंदी अधिक गडद होऊन टिकते. (mehandi tips)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number