मलिकांच्या आरोपावर वानखेडेंचे स्पष्टीकरण

  क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचे आयोजन करणारे आयोजक काशिफ खानला समीर वानखेडेंनी अटक का केली नाही? असा सवाल राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला. त्यांनी केलेल्या आरोपावर मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी उत्तर दिले आहे.   समीर वानखेडे यांनी केवळ दोन शब्दांत मलिकांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. ‘मलिकांनी केलेले आरोप धांदात खोटे […]

मलिकांच्या आरोपावर वानखेडेंचे स्पष्टीकरण

  क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचे आयोजन करणारे आयोजक काशिफ खानला समीर वानखेडेंनी अटक का केली नाही? असा सवाल राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला. त्यांनी केलेल्या आरोपावर मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी उत्तर दिले आहे.

  समीर वानखेडे यांनी केवळ दोन शब्दांत मलिकांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. ‘मलिकांनी केलेले आरोप धांदात खोटे आहेत. मी त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. त्यामुळे आता कायदाच मलिकांवर योग्य कारवाई करेल,’ असे वानखेडेंनी सांगितले आहे.

 मलिकांनी पत्रकार परिषद घेत क्रुझवरारील ड्रग्जपार्टीप्रकरणी काही खुलासा केला आहे. मलिक म्हणाले, ‘मी ज्या दाढीवाल्याचे नाव घेतेल होते त्याचे नाव काशिफ खान आहे. तोसुद्धा त्या पार्टीमध्ये होता. काशिफ खान हा फॅशन टीव्हीशी संबंधित आहे. तसेच तो सेक्स रॅकेटसुद्धा चालवतो. काशिफ खान हा वानखेडेंचा मित्र आहे. त्यामुळेच त्याला अटक करण्यात आली नसल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. मिलकांनी केलेल्या आरोपांवर समीर वानखेडेंनी मोजक्या शब्दांत उत्तर दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number