क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे तसेच त्यांच्या कुटुंबावर अनेक आरोप करून प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे संतप्त समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यासंदर्भात वानखेडे कुटुंबियांनी आज राज्यपालांची भेट घेतली.
मलिकांनी वानखेडे कुटुंबावर केलेल्या आरोपांमुळे वानखेडे कुटुंबाची बदनामी होत आहे. त्यामुळे वानखेडे कुटुंब राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले. मलिकांनी केलेल्या आरोपांची तक्रार वानखेडे कुटुंबांनी राज्यपालांकडे केली. आणि याप्रकरणी राज्यपालांकडून मदतीचे आश्वासन मिळाले असल्याचा दावा वानखेडे कुटुंबियांनी केला आहे. यास्मिन वानखेडे आणि क्रांती रेडकर यांनी सर्वांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
नवाब मलिक गेले महिनाभर समीर वानखेडेंवर आरोप करत आहेत. मात्र वानखेडे कुटुंबियांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तरीही मलिक दररोज नवा आरोप वानखेडे कुटुंबावर करत आहेत. त्यामुळे याप्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात सव्वा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. मलिक दररोज नवा आरोप करून आमची बदनामी करत आहेत. त्यामुळे आमच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आमच्या विरोधात अनेक पोस्ट केल्या जात असून आम्हाला अनेक धमक्याही येत आहेत. या सर्व गोष्टींचा आम्हाला त्रास होत आहे. असे ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या दाव्यात म्हटले आहे. त्यामुळे वानखेडे कुटुंबाची होत असलेल्या बदनामीची तक्रार वानखेडे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. तसेच राज्यपालांनी मदतीचे आश्वासन दिले असल्याचा दावा वानखेडे कुटुंबियांनी केला आहे.