वानखेडेंची चौकशी होणार

मुंबई, १६ मे २०२३, प्रतिनिधी : एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्ट समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. समीर वानखेडेंसह एनसीबी अधिकाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. तर, वानखेडेंच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरांचाही फोन जप्त करण्यात आला आहे. आर्यन खान प्रकरणात चर्चेत असलेले समीर वानखेडे हे आता पुन्हा एकदा अटकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. समीर वानखेडे […]

वानखेडेंची चौकशी होणार

मुंबई, १६ मे २०२३, प्रतिनिधी : एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्ट समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. समीर वानखेडेंसह एनसीबी अधिकाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. तर, वानखेडेंच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरांचाही फोन जप्त करण्यात आला आहे.

आर्यन खान प्रकरणात चर्चेत असलेले समीर वानखेडे हे आता पुन्हा एकदा अटकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. समीर वानखेडे यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले असून; जबाब नोंदवण्यासाठी त्यांना गुरुवार, १८ मे रोजी दिल्लीतील सीबीआय कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

कॉर्डिलिया क्रूझवर सापडलेल्या अमली पदार्थ प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान प्रकरण शांत झालेलं असताना या प्रकरणाने मात्र नवीन वळण घेतले आहे. आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा दावा करत सीबीआयने एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबतच अन्य दोन अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

तर या संपूर्ण प्रकरणात पत्नी क्रांती रेडकर हीने मात्र नवरा समीर वानखेडे यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आहे.तर आता वानखेडेंच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरांचाही फोन जप्त करण्यात आला आहे. आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेईल याकडेच सर्वांच लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number