वाल्मिक कराड आणि महिला पोलिस निरीक्षकांमधील ऑडिओ क्लिप व्हायरल; काय म्हणाला कराड?

वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे समर्थक, कार्यकर्ते, अधिकाऱ्यांसोबतचे ऑडिओ कॉल व्हायरल होताना दिसत आहेत.

वाल्मिक कराड आणि महिला पोलिस निरीक्षकांमधील ऑडिओ क्लिप व्हायरल; काय म्हणाला कराड?

बीड : बीडमधील आवादा कंपनीच्या खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड पोलिस कोठडीत आहे.वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे समर्थक, कार्यकर्ते, अधिकाऱ्यांसोबतचे ऑडिओ कॉल व्हायरल होताना दिसत आहेत. या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून वाल्मिक कराडची बीडमध्ये असणारी दहशत समोर येत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

वाल्मिक कराड आणि महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्यात झालेला संवाद समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलाला वाचविण्याचा आदेश वाल्मिक कराड महिला पोलीस उपनिरीक्षकांना देत आहे. 

हेही वाचा : Cabinet Decision: अटल सेतूवर सवलतीच्या दराने आणखी एक वर्षभर पथकर आकारणी होणार

वाल्मिक कराडच्या मुजोरीची ऑडिओ क्लिप व्हायरल 

मी बीड जिल्ह्याचा बाप आहे. किरकोळ गुन्हा आहे, द्या सोडून असा आदेश कराड फोन कॉलवर महिला पोलीस उपनिरीक्षकांना सांगत आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. मात्र जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. 

वाल्मिक कराड आणि महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्यातील फोन कॉलवरील संवाद व्हायरल होत आहे. या संवादावरून वाल्मिक कराडची बीडमधल्या पोलिसांवर दहशत असल्याचे समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील सगळी सूत्र वाल्मिक कराड हलवत असल्याचा देखील संशय व्यक्त होत आहे. तेथील पोलिसांच्या बदल्या देखील कराडच्या सांगण्यावरून होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number