Walmik Karad Health: तुरुंगात वाल्मिक कराडची प्रकृती अचानक खालावली; तीन दिवसांपासून सलाईनवर, मोठ्या रुग्णालयात…

संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची तुरुंगात प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.

Walmik Karad Health: तुरुंगात वाल्मिक कराडची प्रकृती अचानक खालावली; तीन दिवसांपासून सलाईनवर, मोठ्या रुग्णालयात…

मस्साजोगचे माजी सरपंच दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सध्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडची तब्येत अचानक बिघडल्याने प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड याला आरोग्याच्या तक्रारी जाणवत होत्या. त्यानंतर बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली. मागील तीन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू असून त्याला सलाईन लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

प्राथमिक तपासणीत वाल्मिक कराड याला मूत्रमार्गाशी संबंधित संसर्ग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या संसर्गामुळे शरीरात अशक्तपणा, ताप आणि इतर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. वेळेत उपचार न झाल्यास प्रकृती अधिक गंभीर होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

वाल्मिक कराडच्या आरोग्यस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून, त्याला पुढील उपचारांसाठी मोठ्या वैद्यकीय केंद्रात हलवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात त्याला दाखल करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे आधीच राज्यभरात खळबळ उडाली असताना आता मुख्य आरोपीच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. कारागृह प्रशासन आणि आरोग्य विभाग या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number