गोंदियातील वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाचे सातही दरवाजे सुरू असून यातून वाघ नदीमध्ये पाण्याच्या विसर्ग सुरू आहे.

गोंदियातील वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा  इशारा

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाचे सातही दरवाजे सुरू असून यातून वाघ नदीमध्ये पाण्याच्या विसर्ग सुरू आहे .या धरणातून वाहणाऱ्या बागनदीवरील शिलापूर येथील पुलावरून ८ फिट पाणी वाहत आहे. ही नदी अतिशय वेगाने वाहत आहे. या नदीला पूर आल्यामुळे दोन गावांचा संपर्क तुटलेला आहे. काल संध्याकाळी या नदीवर  ट्रॅक्टर नेत असताना ट्रॅक्टर आणि ड्रायवर वाहून गेला होता. यात ड्रायव्हरला वाचवण्यात यश आले. देवरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाची सात गेट हे ३ फूट उंचीने उघडण्यात आले आहेत. पहिल्यांदाच  या धरणाचे सात गेट उघडण्यात आले आहेत. या क्षेत्रात ग्रामीण भागामध्ये पाऊस पडत असून त्याचा परिणाम धरण साठ्यावर  होत असल्याने सात गेट उघडे करण्यात आले आहेत. त्यामुळे वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा  इशारा देण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number