‘व्हीव्हो घाटकोपर’ नाव तीन दिवसात बदला नाही तर… मनसेचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मेट्रो स्थानकाला दिलेले ‘व्हीव्हो घाटकोपर’ हे नाव तीन दिवसात बदला नाही तर  मनसे स्टाईलने नाव बदलू असा इशारा मनसेने दिला आहे. चीनच्या मालाला विरोध होत असताना दुसरीकडे चिनी मालाच्या जाहिराती करून मुंबई मेट्रो या मालाच्या विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. घाटकोपर मेट्रो स्थानकाचं नाव ‘व्हीव्हो […]

‘व्हीव्हो घाटकोपर’ नाव तीन दिवसात बदला नाही तर… मनसेचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मेट्रो स्थानकाला दिलेले ‘व्हीव्हो घाटकोपर’ हे नाव तीन दिवसात बदला नाही तर  मनसे स्टाईलने नाव बदलू असा इशारा मनसेने दिला आहे.

चीनच्या मालाला विरोध होत असताना दुसरीकडे चिनी मालाच्या जाहिराती करून मुंबई मेट्रो या मालाच्या विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

घाटकोपर मेट्रो स्थानकाचं नाव ‘व्हीव्हो घाटकोपर’ असं केल्याने चिनी बनावटीचा असलेल्या मोबाईलचं नाव घाटकोपर मेट्रो स्थानकाला देणे चुकीचं असल्याचं मनसेचं म्हणणं आहे.

या विरोधात मनसेने आज घाटकोपर मेट्रो स्थानकासमोर स्वाक्षरी मोहीम घेतली. पुढील तीन दिवस ही स्वाक्षरी मोहीम सुरु राहणार आहे. हे नाव मेट्रोने बदललं नाही, तर मनसे स्टाईलने हे नाव बदलू, असा इशारा मनसेने दिला आहे.

यापूर्वीही या मार्गावरील पश्चिम द्रुतगती मार्ग (अंधेरी पूर्व) या स्थानकाला खाजगी कंपनीचं नाव देण्यात आलं होतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number