विवेक पाटील यांनी शेकाप सोडला

गेली दोन वर्षे तुरुंगात असलेले पनवेल विधान सभेचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेक पाटील यांनी तुरुंगातून पत्र लिहून सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. या पत्रातून त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. गेली दोन वर्षे विवेक पाटील कर्नाळा बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. याआधी त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. हा आजार आता बळावला आहे. […]

विवेक पाटील यांनी शेकाप सोडला

गेली दोन वर्षे तुरुंगात असलेले पनवेल विधान सभेचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेक पाटील यांनी तुरुंगातून पत्र लिहून सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. या पत्रातून त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. गेली दोन वर्षे विवेक पाटील कर्नाळा बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. याआधी त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. हा आजार आता बळावला आहे. तुरुंगातून लिहिलेल्या पत्रातही त्यांनी आजारपणाचंच कारण दिलं आहे. विवेक पाटील यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याचं समजताच शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले माजी आ. बाळाराम पाटील?
गेली अनेक वर्षे आपण विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असला तरी, आम्ही त्यांची भेट घेऊ आणि त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू. आज सकाळीच मला विवेक पाटील यांच्या पत्राची माहिती मिळाली. त्या पत्रावरील सही निश्चितपणे विवेक पाटील यांचीच आहे. हा निर्णय घेत असताना त्यांनी शेतकरी कामगार पक्षातील सर्व सहकार्यांच पत्राद्वारे आभार व्यक्‍त केले आहेत. असे वक्तव्य कापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number