गुढीपाडव्याला विठुरायाचं मंदिर फुलांनी सजलं

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सण आणि उत्सवाला विविध प्रकारची आरास, विशेष सजावट करण्यात येते. यावेळीही गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर खास सजावट करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा गाभारा, सोळखांबी, चारखांबि तसेच मंदिराच्या विविध भागाना फुलांनी सजवण्यात आले आहे. यावेळी झेंडु, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडु, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, औरकेड अशा विविध आकर्षक अशा फुलांची […]

गुढीपाडव्याला विठुरायाचं मंदिर फुलांनी सजलं

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सण आणि उत्सवाला विविध प्रकारची आरास, विशेष सजावट करण्यात येते. यावेळीही गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर खास सजावट करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा गाभारा, सोळखांबी, चारखांबि तसेच मंदिराच्या विविध भागाना फुलांनी सजवण्यात आले आहे.

यावेळी झेंडु, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडु, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, औरकेड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास ही मंदिरात करण्यात आली आहे. ही आरास रांझंनगाव येथील विठ्ठल भक्त नानासाहेब पाचनकर यांनी केली. यासाठी जवळपास एक टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. तर विठुरायाचे गोजिरे रूप पाहण्यासाठी भाविक मंदिरात दाखल होत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number