पंढरपुरात विठुरायाची प्रक्षाळ पूजा

पंढरपुर, ७ जुलै २०२३,प्रतिनिधी: आषाढी यात्रेसाठी गेल्या १८ दिवसांपासून अहोरात्र दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाच्या प्रक्षाळपुजेस शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली. परंपरेनुसार आषाढीला देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी देवाचा पलंग काढून मंदिर चोवीस तास दर्शनासाठी सुरू ठेवण्यात येतं. यावेळी देवावरील सर्व राजोपचार बंद करून चोवीस तास दर्शन सुरू असतं. यंदा राज्यभरातून १२ लाखांहून अधिक भाविकांनी आषाढीला […]

पंढरपुरात विठुरायाची प्रक्षाळ पूजा

पंढरपुर, ७ जुलै २०२३,प्रतिनिधी: आषाढी यात्रेसाठी गेल्या १८ दिवसांपासून अहोरात्र दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाच्या प्रक्षाळपुजेस शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली. परंपरेनुसार आषाढीला देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी देवाचा पलंग काढून मंदिर चोवीस तास दर्शनासाठी सुरू ठेवण्यात येतं. यावेळी देवावरील सर्व राजोपचार बंद करून चोवीस तास दर्शन सुरू असतं.

यंदा राज्यभरातून १२ लाखांहून अधिक भाविकांनी आषाढीला विठूरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. परंपरेनुसार १९ जून रोजी देवाचा पलंग काढून देव चोवीस तास दर्शनासाठी उभा होता. शुक्रवारी तब्बल १८ दिवसानंतर ७ जुलै रोजी पुन्हा देवाचा पलंग बसवण्यात येणार आहे. देवाच्या प्रक्षाळ पूजेस सकाळीपासून सुरुवात झाली होती. विठूरायायचा थकवा घालवण्यासाठी देवाच्या अंगाला लिंबू-साखर चोळून गरम पाण्याने स्नान घातले. याचसोबत देवाच्या अंगावर पांढरं वस्त्र टाकून त्यावरून देवाला गरम पाण्याचे मंत्रोपचारात स्नान घालण्यात आले. यानंतर देवाची महापूजा करताना देवाला दूध, गंधासह पंचामृत आणि केशरपाण्याने अभिषेक करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number