विठुरायाची दर्शन रांग एकादशीपूर्वीच हाऊसफुल्ल

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी हजारो भाविक आतापासूनच तयारीला लागले आहेत. सध्या दर्शनासाठी सात तासांचा कालावधी लागतो आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काटेकोर नियोजनाने यंदाची भाविकांची वारी सुखकर होताना दिसत आहे. विशेष म्हणजे एकादशीच्या सोहळ्यास अद्याप दहा दिवसांचा अवधी आहे. दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. संताचे पालखी सोहळे जिल्ह्यात येण्यापूर्वीच विठूरायाची पदस्पर्श दर्शन रांग […]

विठुरायाची दर्शन रांग एकादशीपूर्वीच हाऊसफुल्ल

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी हजारो भाविक आतापासूनच तयारीला लागले आहेत. सध्या दर्शनासाठी सात तासांचा कालावधी लागतो आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काटेकोर नियोजनाने यंदाची भाविकांची वारी सुखकर होताना दिसत आहे. विशेष म्हणजे एकादशीच्या सोहळ्यास अद्याप दहा दिवसांचा अवधी आहे. दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे.

संताचे पालखी सोहळे जिल्ह्यात येण्यापूर्वीच विठूरायाची पदस्पर्श दर्शन रांग हाऊसफुल होत आहे. दर्शन रांगेतील चार पत्रा शेड सध्या भरली आहेत. या ठिकाणी सावली, पिण्याचे पाणी, आरोग्य यंत्रणा आदी सुविधा भाविकांना समितीने पुरवल्या आहेत. असंख्य वारकरी भक्त हे पालखी सोहळ्यातून मध्येच येऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन पायी सोहळ्यामध्ये परत असतात. अशा भाविकांनी सध्या पंढरपुरात मोठी गर्दी केली आहे. साधारणपणे सद्यस्थितीला विठ्ठलाची दर्शन रांग चार किलोमीटर लांबपर्यंत जाऊन पोहोचली आहे. मात्र कुठेही गर्दी नाही, गोंधळ नाही, चेंगराचेंगरी नाही अशा दर्शन मंडपातून वारकरी भक्त विठ्ठलाचे चरण दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ होताना दिसतात. यंदा प्रथमच दाटीवाटीतून आणि गर्दीतून दर्शन आणि सुलभ मोकळी दर्शन रांग व्हावी, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचना केल्या होत्या. मोकळी दर्शन रांग भविकांसाठी पहिल्यांदाच पंढरपुरात तयार करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number