देवाच्या आळंदीत निर्जला एकादशी निमित्ताने, फुलांची सजावट करण्यात आली.. काही दिवसांवर आळंदी पालखी सोहळा येऊन ठेपलाय. तर दुसरीकडे ज्ञानेश्वर महाराजांची कवाड भक्तांनसाठी बंद आहेत.तरी दैनंदिन पूजा अर्चा संजीवन समाधी मंदिरात केली जाते..आज निर्जला एकादशीचे औचित्य साधत रंगीबेरंगी फुलांची आरास पहावयास मिळाली…
पुणे येथील भाविक सचिन चव्हाण व संदीप पोकळे यांनी ही फुलांची सेवा दिली आहे . गुलाब , गुलछडी , झेंडू , ओरकेट , पिंक डी जे , कामिनी अशा विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळखांबी येथे ही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे .