जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं स्टक्चरल ऑडीट करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनंतर या हा निर्णय घेण्यात आला. 2 वर्षापूर्वी राज्यातल्या जुन्या आणि जीर्ण तीर्थक्षेत्रांची पाहणी करुन सुधारणा करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता.
याच धर्तीवर 1800 वर्ष जुनं असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर आता स्ट्रक्चरल ऑडीट होणार आहे. एखाद्या तीर्थक्षेत्राच्या वास्तूचं स्टक्चरल ऑडीट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मंदिर समिती अध्यक्ष डॉ. अतुल भोसलेंच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.