कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याण शहरातील संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपी, विशाल गवळी याने तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली आहे.

कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी  विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याण: कल्याण शहरातील संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपी, विशाल गवळी याने तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली आहे. केवळ 13 वर्षांच्या निष्पाप मुलीवर पाशवी अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या या आरोपीने स्वतःचा जीवनप्रवास तुरुंगात संपवला.

मिळालेल्या माहितीनुसार, गवळीने पहाटे चारच्या सुमारास शौचालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे तळोजा कारागृहात खळबळ उडाली असून, तुरुंग प्रशासन सतर्क झाले आहे. घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारागृहात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशीही सुरु करण्यात आली आहे.

ही धक्कादायक घटना गेल्या डिसेंबरमध्ये घडली होती. कोळसेवाडी भागात राहणाऱ्या 13 वर्षीय मुलीला फसवून विशाल गवळीने आपल्या घरी नेले आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केला. आपला गुन्हा उघड होऊ नये म्हणून त्याने तिची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह बापगाव परिसरात टाकून दिला होता. या अमानवी कृत्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली होती.

गुन्हा केल्यानंतर विशाल गवळी शेगावकडे पळून गेला होता. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला शोधून काढले आणि ताब्यात घेतले. न्यायप्रविष्ट झालेल्या या खटल्यात कारवाई सुरु असतानाच गवळीने तुरुंगात आयुष्याचा शेवट केला. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number