Viral Video: आधी सामना जिंकला आणि मग बायकोचं मन! विजयानंतर किंग कोहलीचा रोमँटिक अंदाज; विराट-अनुष्काचा व्हिडिओ तुफान व्हायरल

विराट कोहलीने आयपीएल 2026 च्या सामन्यात शानदार खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला सामन्यानंतर अनुष्का शर्माला दिलेल्या फ्लाइंग किसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Viral Video: आधी सामना जिंकला आणि मग बायकोचं मन! विजयानंतर किंग कोहलीचा रोमँटिक अंदाज; विराट-अनुष्काचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Viral Video: आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दमदार विजय मिळवत स्पर्धेला शानदार सुरुवात केली. या विजयात अनुभवी फलंदाज विराट कोहलीचा मोठा वाटा राहिला. त्याने संयमी पण आक्रमक फलंदाजी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. मात्र सामन्यानंतर त्याने केलेल्या एका खास कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हैदराबादने दिलेल्या 200 पेक्षा अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोहलीने जबाबदारीने खेळ करत नाबाद अर्धशतक झळकावले. त्याच्या फलंदाजीत संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. चौकार आणि षटकारांच्या फटकार्‍यांनी त्याने संघाला विजयाच्या दिशेने नेले. अखेर संघाने हे आव्हान सहज पार करत मोठा विजय मिळवला.

हेही वाचा: RCB vs SRH: कोहली-पडीक्कलच्या जबरदस्त खेळीने उडवला हैदराबादचा धुव्वा; 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करत मिळवला दणदणीत विजय

सामना जिंकल्यानंतर कोहलीने मैदानावरच आपली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला फ्लाइंग किस देत आनंद व्यक्त केला. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. कोहली आणि अनुष्कामधील हा भावनिक क्षण अनेकांच्या मनाला भिडला आहे.

कोहलीने सामन्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत आपल्या फिटनेस आणि तयारीबद्दलही महत्त्वाचे वक्तव्य केले. दीर्घ काळ टी20 क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतरही तो पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरल्याचे त्याने स्पष्ट केले. त्याच्या मते, थोडा ब्रेक मिळाल्याने मानसिक ताजेपणा टिकून राहतो आणि खेळात अधिक उत्साहाने परतता येते.

हेही वाचा: IPL 2026 RCB vs SRH : भुवनेश्वर कुमारच्या ओव्हरमध्ये कोहलीची 'ती' चूक अन् संपूर्ण स्टेडियम झाला हक्काबक्का

“मी कधीही अपुरी तयारी करून मैदानात उतरत नाही. जेव्हा परततो, तेव्हा पूर्ण तयारीनिशीच येतो,” असे तो म्हणाला. संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करणे हेच आपले ध्येय असल्याचेही त्याने नमूद केले.

कोहलीच्या या खेळीमुळे आरसीबीचा आत्मविश्वास वाढला असून पुढील सामन्यांसाठी संघ अधिक जोमाने मैदानात उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर कोहलीच्या वैयक्तिक आयुष्यातील हा छोटासा क्षणही चाहत्यांसाठी खास ठरला आहे.

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात कोहलीने केवळ बॅटनेच नव्हे, तर आपल्या खास सेलिब्रेशननेही चाहत्यांची मनं जिंकली. मैदानावरील त्याचा खेळ आणि मैदानाबाहेरील भावना व्यक्त करण्याची पद्धत यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number