मुंबई, २५ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : समाज माध्यमांवरील सर्वाधिक लोकप्रीय जोडी म्हणजे विरुष्का. ही जोडी समाज माध्यमांवर चांगलीच सक्रीय असते. ते दोघेही त्यांच्या जीवनातील काही क्षण फोटो आणि व्हिडीओच्या रुपात समाज माध्यमांवर सामायिक करत असतात. त्यांचे हे व्हिडीओज समाज माध्यमांवर चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस पडतात. नुकताच विराट आणि अनुष्काने एक रील व्हिडीओ सामायिक केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही व्यायामशाळेत व्यायाम न करता उत्साहात नृत्य करताना पाहायला मिळाले.
मात्र, व्हिडिओ रील बनवताना विराटच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसून आलं. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत असून विराट आयपीएल क्रिकेट सामन्यात खेळणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. विराट हा आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर या संघात खेळत आहे. मात्र, आता पायाला दुखापत झाल्याने विराट आयपीएलमध्ये खेळू शकेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, विरुष्काचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असून विराटने काळजी घेऊन या गोष्टींपासून लांब राहावे असा सल्ला चाहत्यांनी दिला आहे.
विराट आणि अनुष्का ही जोडी समाज माध्यमांवर नेहमीच मजेशीर व्हिडिओ सक्रीय करत असते. त्यांच्या या व्हिडिओला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो. तर प्रेक्षक त्यांच्या पुढच्या व्हिडिओसाठी उत्सुक असतात. दरम्यान, विरुष्काला कन्यारत्न झाल्यामुळे अभिनेत्री अनुष्काने अभिनय काळात काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर अनुष्काचा ‘चकदा एक्सप्रेस’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अनुष्का भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या भूमिकेत झळकणार आहे.