वृत्तसंस्था, नवी दिल्ली
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने इटलीमध्ये अनुष्का शर्मासोबत लग्न केलं होतं. याच लग्नाच्या रिसेप्शनच्या भव्य सोहळ्याचं आयोजन दिल्लीत करण्यात आलंय. या सोहळ्याला जवळपास 1 हजारपेक्षा जास्त पाहुण्यांनी हजेरी लावली.
उत्तर भारतीय पदार्थांची रेलचेल या सोहळ्यात पाहायला मिळाली. बुधवारी विराट कोहली आणि अनुष्काने पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांना रिसेप्शनसाठी इनव्हाईट केलं होतं. पंतप्रधानांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली.
दिल्लीतल्या ताज डिप्लोमॅटिक एनक्लेवमध्ये हे रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. यानंतर दुसरं रिसेप्शन 26 डिसेंबरला मुंबईत होणार आहे. यात बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रीटी येण्याची शक्यता आहे.