Virar News: हिरोगिरी जीवावर बेतली! विरारमध्ये साप गळ्यात घालून व्हिडीओ बनवताना तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू

विरारमध्ये सोशल मीडियासाठी साप गळ्यात घालून स्टंट करणाऱ्या 40 वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाला.

Virar News: हिरोगिरी जीवावर बेतली! विरारमध्ये साप गळ्यात घालून व्हिडीओ बनवताना तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू

विरार येथे सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विषारी साप पकडून त्याच्यासोबत स्टंट करत असताना सर्पदंश झाल्याने या तरुणाने प्राण गमावले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विरार पश्चिमेतील नवापूर भागात साप दिसताच राजू चंदू बरड (वय 40) यांनी तो पकडला. ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जाते. साप पकडल्यानंतर त्यांनी त्याला गळ्यात टाकून मस्ती सुरू केली. उपस्थित काही जणांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याची चर्चा आहे.

सापाची छेड काढत असताना अचानक सापाने त्यांच्या हाताला दंश केला. सुरुवातीला परिस्थितीची गांभीर्य लक्षात न आल्याने काही वेळ गेला. मात्र प्रकृती झपाट्याने बिघडू लागल्याने स्थानिकांनी त्यांना तातडीने खारोडी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर बेफिकीर स्टंट आणि सोशल मीडियासाठी जीव धोक्यात घालण्याच्या प्रवृत्तीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी नागरिकांना अशा धोकादायक प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number