जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई विरारच्या नारंगी परिसरातील मंदिरात दोन चोरांनी डल्ला मारल्याची घटना समोर आलीय. एकवीरा देवीच्या मंदिरात गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडलीय. मूर्तीवरील आभूषण आणि दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केलीय. मदिरात असलेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली असून पोलिसांचा तपास सुरु आहे.